Shirdi Sai Mandir: शिर्डीतील साई मंदिराची दर्शनासाठी नवी व्यवस्था, दिवसाला 15 हजार जणांना मिळणार प्रवेश

मात्र राज्य सरकारने तब्बल आठ महिन्यानंतर मंदिरे, धार्मिक स्थळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा उघडण्यासाठी परवानगी दिली.

शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

Shirdi Sai Mandir:  राज्यात कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती अद्याप कायम आहे. मात्र राज्य सरकारने तब्बल आठ महिन्यानंतर मंदिरे, धार्मिक स्थळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा उघडण्यासाठी परवानगी दिली. परंतु त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना ही दिल्या आहेत. तर आता शिर्डीतील साई मंदिराने सुद्धा दर्शनासाठी एक नवी व्यवस्था सुरु केली आहे. त्यानुसार आता दिवसाला भाविकांना 15 हजार भाविकांना साई बाबांचे दर्शन मिळणार आहे.(मुंबई मधील नाट्यगृह भाडे दरात 75% सवलत; पालिकेचा नाट्य व्यावसायिकांना दिलासा)

नागरिकांना लागून आलेल्या सुट्ट्या आणि विकेंडमुळे मिळालेली सुट्टी यामुळे साई बाबांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर याआधी साई बाबांच्या मंदिरात दिवसाला फक्त 6 हजार भाविकांना दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता 15 हजार भाविकांना एकाच दिवशी दर्शन घेता येणार आहे. परंतु त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास घेण्यासह दर्शनासाठी ओळखपत्र ही अनिवार्य असणार आहे.(Maharashtra: सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात येणार, छगन भुजबळ यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य)

दरम्यान, शिर्डीतील साई बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून साईभक्त येतात. तर एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना नियमांचे पालन करावे असे वेळोवेळी सांगण्यात आले आहे. तर आता 15 हजार भाविकांना दर्शन मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.