Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात मागील महिनाभर एनसीबीची मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीवरील कारवाई चर्चेमध्ये राहिली आहे. यामध्ये एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) देखील समीर वानखेडे (Sameer Wankhed) यांच्यावर रोज नवनवे आरोप करत धक्कादायक खुलासे करत आहेत. अशातच आज शिवेसेनेच्या संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर आता दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांच्यासोबतही शरद पवारांची गाठभेट झाली आहे. दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भेटीचं कारण खाजगी असल्याचं सांगितलं तरीही राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. Aryan Khan Cruise Drugs Party Case: नवाब मलिक यांचा Mohit Kamboj वर हल्लाबोल; आर्यन खानला अडकवून खंडणी वसूल करण्याचं षडयंत्र .

शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीत ड्रग्ज प्रकरणातील एनसीबी कारवाईवर चर्चा झाल्याची शक्यता दाट आहे. या प्रकरणामध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान देखील आढळल्याने सध्या हे प्रकरण हाय प्रोफाईल झालं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी मोहित कंबोज या भाजपा कार्यकर्त्याला क्रुझ ड्रग्स प्रकरणी मास्टरमाईंड म्हटल्यानंतर त्यानेही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं-मुली ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. आणि नवाबांनी देखील त्याची कबुली दिल्याची कंबोजने म्हटलं होतं. Kranti Redkar's Letter To CM Uddhav Thackeray: क्रांती रेडकर चं पती समीर वानखेडेंवरील आरोप-प्रत्यारोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 'एक मराठी माणूस म्हणून न्यायाची अपेक्षा'.

सध्या मुंबई पोलिसांच्या SIT कडून एनसीबी मुंबईचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात तपास सुरू झाला आहे. त्याबाबतही शरद पवारांनी माहिती घेतली असू शकते असा अंदाज आहे. दरम्यान आज सिल्वर ओक वर सकाळी संजय राऊत सपत्निक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. यावेळी राऊतांनी ही भेट मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी असा कयास असला तरीही त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाली असू शकते. राऊतांनी आज सकाळीच एक सूचक ट्वीट करताना स जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. पण आता ही 'दो कौडी' ची लोकं नेमकी कोण ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.