तिवरे धरण दुर्घटना: बेपत्ता तिघांच्या शोधासाठी आजपासून एनडीआरएफ पुन्हा करणार प्रयत्न
यामध्ये 23 जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी मधील तिवरे धरण फुटल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील सात गावं वाहून गेली आहेत. या दुर्घटनेतील 20 जणांचे मृतदेह हाती आले असून अन्य तीन मृतदेहांचा शोध घेण्यासाठी आज एनडीआरएफ पथकाचे जवान पुन्हा शोध मोहिम सुरू करणार आहेत. आठवड्याभरापूर्वी घडलेल्या या दुर्घटनेवर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरू झाले आहेत.
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी या दुर्घटनेला खेकडे जबाबदार असल्याचा जावईशोध लावला होता. त्यावरूनही अनेक राजकीय पक्षांनी, सामान्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सध्या मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे या शोध मोहिमेमध्ये अडथळा येत आहे. तानाजी सावंत यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन; पळून जाणाऱ्या खेकड्यांना अटक करण्याची मागणी
येथे पहा तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची यादी
तिवरे धरण सातदिवसांपूर्वी फुटल्यानंतर ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले. आणि बघता बघता हाहाकार पसरला.