Pune Rape: पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाळ जन्मल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे (Pune) येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना हडपसर (Hadapsar) येथून सर्वांना हादरून टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. वडिलांना ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे.

Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

पुणे (Pune) येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना हडपसर (Hadapsar) येथून सर्वांना हादरून टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. वडिलांना ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पाडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी ही हडपसर भागात आपल्या कुटुंबियांसोबत राहते. या भागात राहणाऱ्या बिट्टू शेख याच्याशी तिची ओळख होती. दरम्यान, लॉकडाऊन पूर्वी बिट्टूने तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी पीडिताला दिली होती. लॉकडाउन आणि कौटुंबिक समस्यांमुळे पीडितेने झालेल्या घटनेबद्दल कुणालाही माहिती दिली नाही. परंतु, तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Palghar: 65 महिलांवर बलात्कार करुन व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या बस कंडक्टरला बेड्या

याआधी हडपसर येथे एका 15 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 2 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात पोस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणातील इतर 2 आरोपींचा शोध सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement