Raj Thackeray ED Enquiry Live Updates: राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर पडले, कुटुंबासह 'कृष्णकुंज' कडे रवाना
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज ईडी च्या कार्यालयात मनसे प्रमुख राज ठाकरेयांची चौकशी होणार आहे. या प्रकरणामध्ये राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची चौकशी झाल्यानंतर आता आज ईडीच्या ठाणे कार्यालयात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत.
-राज ठाकरे आता ईडी ऑफिसमधून बाहेर आले आहेत. तर ईडी कडून चक्क साडे आठ तास त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच राज ठाकरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची ईडीला उत्तरे दिली असल्याचे बोलले जात आहे.
-ईडी अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले आहे. परंतु पुढे गरज पडल्यास राज ठाकरे यांना बोलावण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांची अद्याप ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र साडेसात तास उलटून गेले तरीही राज ठाकरे कार्यालयाबाहेर आले नाहीत. त्यामुळे ते कधी बाहेर येतील याची सर्वजण वाट पाहत आहे. परंतु थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयातून बाहेर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचसोबत ईडी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
राज ठाकरेआज सकाळी 11.30 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहचले आहेत. त्यानंतर सुरू झालेली ईडी चौकशी अद्यापही सुरू आहे. पुढील काही तास ईडीकडून प्रश्न विचारले जातील असे सांगण्यात आले आहे. तसेच आजच राज ठाकरेंची चौकशी संपणार की पुढील अजून काही दिवस त्यांना हजेरी लावावी लागणार याकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मनसे कडून राज ठाकरेंच्या आवाहनाचे पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून शांतता राखण्याचे आवाहन शेअर करण्यात आले आहे. सध्या मुंबईमध्ये काही ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही मनसे पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळी आकरा वाजलेपासून ईडी कार्यालयात सुरु असलेली राज ठाकरे यांची चौकशी अद्यापही सुरुच आहे. ही चौकशी पुढे दोन ते तीन तास सुरु राहण्याची शक्यता प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्याकडून औपचारीकता पूर्ण करण्यासाठी काही फॉर्म भरुन घेण्यात आले. त्यानंतर त्यांना काही प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांच्याकडून जाणून घेतली जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर, राज ठाकरे यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवले जाऊ शकते, असेही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
राज ठाकरे यांची सुरु असलेल्या ईडी चौकशी प्रकरणी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. या वेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारच्या विरोधात जे जे बोलतात त्यांच्यावर दबाव टाकला जातो. सरकारला जर ईडी मार्फत चौकशी करायची होती तर, ही चौकशी निवडणुकीच्या तोंडावरच का? या आधीही ही चौकशी करता आली असते. सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करतं आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक होते. पण, त्यांच्यात व्यक्तीगत वाद कधीच नव्हता. सत्तेत असतानाही आणि नसतानाही त्यांनी कधीही सूडाची भावना भाळगली नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे हे सहृदयी व्यक्तीमत्व. त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत दिलेली प्रतिक्रिया हेच दर्शवते. उद्धव ठाकरे हे नातं जपणारं व्यक्तीमत्व- संजय राऊ, शिवसेना नेते
आज सकाळी 10.20 मिनिटांनी राज ठाकरे कृष्णकुंज वरून बाहेर पडल्यानंतर पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, लेक उर्वशी सोबत त्यांची बहीण जयवंती देशपांडे यांच्यासोबत निघाले. मात्र ठाकरे कुटुंबियांना ईडी ऑफिसजवळ काही अंतरावर रोखण्यात आले. आता काही मनसे नेते आणि ठाकरे कुटुंबीय ईडी ऑफिसजवळ असलेल्या ग्रॅन्ड हॉटेलमध्ये थांबले आहेत. दक्षिण मुंबईत त्यांच्या सोबत काही पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत.
राज ठाकरे बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. पुढील किती तास त्यांची चौकशी होणार याकडे आता मनसे कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबियांचं लक्ष लागून राहिले आहे.
शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज' वरून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे, बहीण जयवंती, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली आणि लेक उर्वशी ठाकरेदेखील उपस्थित आहेत. त्यासोबतच बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकरदेखील असणार आहेत.
शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांचे निवासस्थान 'कृष्णकुंज' वरून ईडी कार्यालयाकडे रवाना होणार आहेत. राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली आणि लेक उर्वशी ठाकरेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकरदेखील असणार आहेत.
मरीन ड्राईव्ह, MRA, मार्ग, दादर आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे शहरात मनसे कार्यकर्ते काळ्या रंगाचे आणि EDiots Hitler असा मेसेज लिहलेला टी शर्ट घालून फिरत आहेत. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर धरपकड सुरू करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये आज सकाळी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतल्यानंतरआज प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यात अजून काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज ईडी च्या कार्यालयात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणामध्ये राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची चौकशी झाल्यानंतर आता आज ईडीच्या ठाणे कार्यालयात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. रविवार (18 ऑगस्ट ) दिवशी ईडी कडून राज ठाकरेंना समन्स पाठवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता आज राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दादर परिसरासह मुंबई, ठाणे परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून आज सकाळी मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दादर परिसरात 'कोहिनुर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनुर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची सोमवार, 19 ऑगस्ट 2019 रोजी सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित होते. राज ठाकरे यांना ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. त्यामुळे आज राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जातील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)