रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेपेक्षा ट्विट जास्त सोडलेत; राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची केंद्र सरकारवर टीका
स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारकडे केली होती
स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारकडे केली होती. दरम्यान, पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाला साधला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही पीयूष गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेपेक्षा ट्विट जास्त सोडले आहेत, अशा शब्दात पीयूष गोयल यांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर भाजच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.
देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकाउनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदेही ठप्प आहे. त्यातच रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार पायीच आपापल्या मूळ गावी जाताना दिसत आहे. याच दरम्यान रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी 14 मे रोजी विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात विशेष रेल्वेगाड्या कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्रीने केंद्राकडे केली होती. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देतो, असे ट्विटरवरून जाहीर करून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात तटविला. तसेच त्यांनी राज्याकडे प्रवाशांची यादी देण्याचीही मागणी केली होती. हे देखील वाचा- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बीकेसी येथे एमएमआरडीने उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्तांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नुकतेच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटला पीयूष गोयल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.