कोरोना संकटाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार

कोरोना संकटाच्या (Corona Crisis) काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचं मोठं काम केलं, असं गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी आज काढले. आज सोलापूर (Solapur) येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी अनिल देशमुख बोलत होते.

Home Minister Anil Deshmukh (PC - Twitter)

कोरोना संकटाच्या (Corona Crisis) काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचं मोठं काम केलं, असं गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी आज काढले. आज सोलापूर (Solapur) येथे कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कोरोना योद्ध्यांच्या परिवाराला शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी अनिल देशमुख बोलत होते.

दरम्यान, यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मृत झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते. (हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत; कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती)

अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. पोलिसांचं गेल्या तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने 58 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून 50 लाखांचे सानुग्रह अनुदान, 10 लाख पोलीस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून काही रक्कम असे 65 लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास सर्व सोयीसुविधा असणाऱ्या दवाखान्यात उपचारांची सोय करण्यात आली आहे. राज्य सरकार पोलीस परिवारांच्या पाठिशी आहे, असा विश्वासही यावेळी अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी अनिल देशमुख यांनी कोरोनामुळे बाधित होऊन मृत झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक ताजोद्दीन शेख यांच्या पत्नी श्रीमती सगीरा शेख यांना 50 लाखांचा धनादेश दिला. तसेच पोलीस नाईक महादेव राठोड यांच्या पत्नी श्रीमती जयश्री राठोड यांना 50 लाख आणि 10 लाख असे 60 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement