मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाइन फसवणूक

सर्वसामान्य जनतेप्रमाणेच मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पवई येथे राहणाऱ्या 67 वर्षीय शास्त्रज्ञाला फेसबुक वरील मैत्रिणीने 3 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर वांद्रे येथील शास्त्रज्ञाला एका घरातील सामान दुसऱ्या घरात शिफ्ट करून देतो, असे सांगत 58 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार वाढत आहे. सर्वसामान्य जनतेप्रमाणेच मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पवई येथे राहणाऱ्या 67 वर्षीय शास्त्रज्ञाला फेसबुक वरील मैत्रिणीने 3 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तर वांद्रे येथील शास्त्रज्ञाला एका घरातील सामान दुसऱ्या घरात शिफ्ट करून देतो, असे सांगत 58 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. (हेही वाचा - मुंबई: घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन पद्धतीने विकण्याच्या नादात महिलेने गमावले 40 हजार)

नेमकी काय आहे प्रकरण ?

पवई येथील शास्त्रज्ञ हे निवृत्तीनंतर सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांना फेसबुकवर रोझी मॉर्गन नावाच्या महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण झाली. त्यांच्यात दररोज चॅटिंग होत होती. याच दरम्यान, रोझीने शास्त्रज्ञाला सांगितले की, 'मी औषध कंपनीत कामाला टयात जो नफा मिळेल त्यापैकी 70 टक्के वाटा तुमचा असेल. यावर शास्त्रज्ञांनी हा व्यवहार मान्य असल्याचे सांगितले. तसेच अॅडव्हान्स म्हणून 3 लाख 50 हजार रुपयेही दिले. त्यानंतर तेल मिळत नसल्याने रोझीला संपर्क केला. मात्र, रोझीचा फोन बंद सांगत होता. या सर्व प्रकारानंतर शास्त्रज्ञाला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी लागलीच पवई पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पवई पोलिस याबाबतीत अधिक तपास करत आहे.

हेही वाचा - मुंबई: ऑनलाईन बिअर खरेदी करण्याच्या नादामध्ये महिलेला 87 लाख रूपयांचा गंडा

तसेच वांद्रे येथे राहणारे शास्त्रज्ञही ऑनलाइन फसवणुकीचा शिकार बनलेले आहेत. या शास्त्रज्ञांनी गुगलवर जुन्या घरातील सामान नवीन घरी नेण्यासाठी मूव्हर्स अँड पॅकर्सचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी एका कंपनीला संपर्क केला. या कंपनीच्या दोन प्रतिनिधी शास्त्रज्ञाच्या घरी आले. त्यांनी शास्त्रज्ञाच्या घरातील सामान पाहून 79 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. तसेच सध्या 59 हजार रुपये द्यावे लागतील. यावर शास्त्रज्ञांनी त्यांना पैसे दिले आणि सामान शिफ्ट करण्याचा दिवस ठरवला. परंतु, त्यांनी सांगितलेल्या दिवशी दोघेही आले नाही. त्यानंतर शास्त्रज्ञाला ही निव्वळ फसवणूक असल्याचे समजले. त्यांनी लगेचच वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली.