Mont Blanc कंपनीच्या नावे होत आहे ऑनलाईन आर्थिक फसवणुक; महाराष्ट्र सायबरने प्रसिद्ध केली फेक वेबसाईट्सची यादी (See List)
केंद्र सरकारसह राज्य सरकारही या विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. मात्र अशा परिस्थितीचा फायदा घेऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) जणू काही अव्वल आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी (Coronavirus) झुंज देत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारही या विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. मात्र अशा परिस्थितीचा फायदा घेऊन गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यात सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) जणू काही अव्वल आहे. सध्या मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) कंपनीच्या नकली वेबसाईट (Fake Websites) संदर्भात आर्थिक फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर लोकांनी नकली वेबसाईटपासून सावध राहावे असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. लॉक डाऊनमध्ये अनेक खोट्या वेबसाईटद्वारे, लोकांना मेसेजेस पाठवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये Mont Blanc या कंपनीच्या नावे लोकांना लुटण्याचे प्रकार सुरु आहेत.
Mont Blanc ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी असून, इथे तुम्ही विविध प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकता. सध्या कंपनीने उत्पादनांचा खप व्हावा म्हणून, आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर, विशेषतः शाई पेनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. मात्र अनेक भामटे या कंपनीच्या नावे खोटे मेसेजेस पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. यावर आता महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास, त्यावर क्लिक करू नये. (हेही वाचा: BMC: मुंबईत एकूण 25 हजार 317 कोरोनाबाधित; दिवसभरात 1 हजार 382 नव्या रुग्णांची नोंद तर, 41 जणांचा मृत्यू)
या वेबसाईट सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.
पहा वेबसाईट्सची यादी –
https://montblancindia.co
https://montblancsindia.com
https://montblancindias.com
https://montblancindia.org
https://montblancindia.co
याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग सांगतात- वरील कोणत्याही वेबसाईटद्वारे जर का तुम्ही खरेदी केली असेल व डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल, अशांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी.