IPL Auction 2025 Live

Veer Savarkar Jayanti 2020: स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, विचार, प्रेरणेचा स्त्रोत म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केली आदरांजली; शेअर केला खास व्हिडिओ

आणि पुन्हा त्यांच्या विचारांवर देशामध्ये आपल्याला स्फुर्लिंग जागृत करावं लागेल. असा संदेश व्हिडिओ- ऑडिओ मेसेजमधून देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis | Image only representative purpose (Photo credit: File Image)

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि भाजप कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांनी आज वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त ट्वीटरच्या माध्यमातून आपली आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान यंदा सावरकरांच्या 137 व्या जयंती निमित्त त्यांनी एक जुना व्हिडिओदेखील शेअर केला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपेक्षा सहन केलेल्या देशभक्तांपैकी आहेत. त्यांची ओळख समाजाला कवी, लेखक, जातीभेद दूर सारणारे समाजसेवक म्हणून आहे. देशभक्ती जागृत करून अनेकांना तेज, विचार, प्रेरणा देणार्‍या स्वातंत्र्यवीरांना आज विनम्र आदरांजली अर्पण करतो असं म्हणतं त्यांनी आज सावरकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान आजच्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहचवणं गरजेचे आहे. आणि पुन्हा त्यांच्या विचारांवर देशामध्ये आपल्याला स्फुर्लिंग जागृत करावं लागेल. असा संदेश त्यांनी या व्हिडिओ- ऑडिओ मेसेजमधून दिला आहे. Veer Savarkar Jayanti 2020 Quotes: वीर सावरकर यांचे देशप्रेम, एकात्मता ते जीवनाकडे सकारत्मक बघायला शिकणारे क्रांतिकारक विचार!

देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील खास व्हिडीओच्या माध्यमातून सावरकरांना आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक मध्ये भगूर गावात 28 मे 1883 साली झाला होता. प्रखर हिंदुसंघटक असणार्‍या सावरकरांनी विज्ञानाचा पुरस्कार करत समाजातील रूढी- परंपरांना छेद दिला होता. ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांनी सावरकरांना ' स्वातंत्र्यवीर' ही उपाधी दिली होती.