वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसींना राष्ट्रीय कोट्यातून 27 टक्के आरक्षण द्यावे; छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता ओबीसींना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे 27 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांच्याकडे केलेली आहे.

Chhagan Bhujbal (Photo Credit: ANI)

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता ओबीसींना (OBC) राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical Education) हक्काचे 27 टक्के आरक्षण (Reservation) द्यावे, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Harshvardhan) आणि सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांच्याकडे केलेली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसींना राष्ट्रीय कोट्यातून 27 टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु, केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील 15 टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ 3.8 टक्केचं आरक्षण दिले आहे. (हेही वाचा - पुण्यात आज 269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5436 वर पोहोचली)

शासनाने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केले तर हे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी 66, 333 जागांमधून केंद्रीय कोट्यातील 15 टक्के प्रमाणे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणानुसार, 2 हजार 578 जागा आरक्षित असायला पाहिजे. परंतु, सध्या केवळ 371 जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणीही भुजबळ यांनी केली आहे.