पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी, लॉकडाऊन काळात नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?- शिवसेना

संपादकीयातून उपस्थित केलेले मुद्दे पाहता भारतीय जनता पक्षातून आता काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Narendra Modi(photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना (Daily Saamana) संपादकीयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली आहे. एका बाजूला पंतप्रधान मोदी यांचे कौतुक कर दुसऱ्या बाजूला मोदी यांच्यावर संपादकीयातून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील सक्षम नेतृत्व आहे. त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुलांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करुन देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी (Notebandi) आणि लॉकडाऊन (Lockdown) काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? अशा रोखडा सवा शिवसेनेने विचारला आहे.

सामना संपादकीयातील ठळक मुद्दे

सामना संपादकीयाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. संपादकीयातून उपस्थित केलेले मुद्दे पाहता भारतीय जनता पक्षातून आता काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.