Navratri 2019: मुंबादेवी मंदिरासह देशभर देवीच्या मंदिरात आज 'दुर्गाष्टमी' चा उत्सव

आज दुर्गाष्टमीचं औचित्य साधून मुंबई सह देशभरातील देवीची मंदिरं सजली आहे. दक्षिण मुंबईतील 'मुंबादेवी' मंदिरातही (Shree Mumbadevi Temple) आज सकाळी काकड आरतीच्या दरम्यान मोठी गर्दी पहायला मिळाली.

Shree Mumbadevi Temple (Photo Credits: Twitter/ ANI)

Durgashtami 2019:  आज शारदीय नवरात्री मधील अष्टमीचा दिवस आहे. दुर्गाष्टमी म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत साजरी केली जाणारी नवरात्र आदिशक्तीचा जागर करण्यासाठी असते. सृष्टीतील नवशक्तीचा याच्या माध्यमातून पूजा करण्याची प्रथा आहे. आज दुर्गाष्टमीचं औचित्य साधून मुंबई सह देशभरातील देवीची मंदिरं सजली आहे. दक्षिण मुंबईतील 'मुंबादेवी' मंदिरातही (Shree Mumbadevi Temple) आज सकाळी काकड आरतीच्या दरम्यान मोठी गर्दी पहायला मिळाली.

दुर्गाष्टमी दिवशी दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या स्वरूपात देवीची आराधना केली जाते. धन संपत्ती यांच्या वृद्धीसाठी भाविक आज देवीचं दर्शन घेऊन तिची मनोकामे पूजा-कामना करतात. Kanya Pujan 2019 Date: शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी दिवशी कन्या पूजन करण्याचं महत्त्व, शुभ वेळ काय?

मुंबादेवीच्या काकड आरती वेळेसची दृश्य

दुर्गाष्टमी दिवशी अनेक घरांमध्ये स्त्रिया कन्या पूजनदेखील करतात. 2 ते 10 वर्षाच्या चिमुकल्यांचं आजच्या दिवशी देवीचं रूप मानून पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू आणि शिरा-पुरीचा प्रसाद दिला जातो.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement