Nagpur Shocker: विवाहबाह्य संबंधामुळे मुलीने करवली आपल्या वडिलांची हत्या; 5 लाखांची दिली सुपारी, 15 वेळा केले वार

17 मे रोजी नागपूर-नागभीड महामार्गावरील पेट्रोल पंपावर तीन मुखवटाधारी हल्लेखोरांनी दिलीपवर चाकूने 15 वार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी पेट्रोल पंपातून 1.34 लाख रुपयांची रोकडही लुटली.

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका 35 वर्षीय मुलीने सुपारी देऊन आपल्याच वडिलांची हत्या करवली. भिवापूर येथील पेट्रोलपंप मालक दिलीप सोनटक्के यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्या मुलीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीने 5 लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांणा संपवले आहे. मृत वडिलांचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते, ज्याला त्यांची मुलगी आणि पत्नीचा विरोध होता. याच कारणावरून घरात सतत भांडणे व्हायची. याच त्रासाला कंटाळून मुलीने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली.

पेट्रोल पंप मालक दिलीप यांची मुलगी प्रिया माहुरताळे ही या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात दिलीपचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. दिलीप आपल्या कथित अनैतिक संबंधाला विरोध करत असलेली पत्नी आणि आरोपी मुलीसह कुटुंबातील इतर सदस्यांवर त्रास देत होता, त्यांच्यावर अत्याचार करत होता. त्यामुळे प्रियाने तिच्या वडिलांना मारण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या हत्येसाठी प्रियाने 5 लाख रुपयांची सुपारी दिली. 17 मे रोजी नागपूर-नागभीड महामार्गावरील पेट्रोल पंपावर तीन मुखवटाधारी हल्लेखोरांनी दिलीपवर चाकूने 15 वार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी पेट्रोल पंपातून 1.34 लाख रुपयांची रोकडही लुटली. दिलीपला वाचवण्याच्या प्रयत्नात पेट्रोल पंपाचा कर्मचारीही जखमी झाला. शेख अफरोज उर्फ ​​इम्रान हनिफ (33), मोहम्मद वसीम लाल मोहम्मद (21) आणि जुबेर खान (25) या तिघांना पोलिसांनी हत्येनंतर काही तासांतच पकडले. चौकशीदरम्यान आरोपींनी मृताची मुलगी प्रियाच्या संपूर्ण कटाचा खुलासा केला. (हेही वाचा: Sangali Miraj Crime: धारधार शस्त्राने सपासप वार, बायकोच्या हल्ल्यात नवरा ठार; सांगली येथील मिरज शहरातील घटना)

आता प्रियाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियाचा पती किशोर हाही त्याच्या सासरच्या पेट्रोल पंपावर काम करत असे. पोलिसांनी सांगितले की, मृत दिलीप हा अनेकदा भिवापूर येथे राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्याची धमकी देत ​​होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif