नागपूर: नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा उमेदवारांच्या रॅलीला सुरूवात; आज भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतल्यानंतर नागपूर (Nagpur) दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.

Devendra Fadnavis (Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 (Assembly Election 2019) तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतल्यानंतर नागपूर (Nagpur) दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत. नागपूरमधील संविधान चौकातून (Samvidhan Chowk Nagpur) रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान फडणवीस यांची पत्नी अमृतासह (Amruta Fadnavis) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित आहेत.आज शुक्रवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janata Party) मोठा विजय मिळवला होता. पुढील विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष आपला झेंडा रवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यासाठी केवळ 2 आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण येथून अर्ज दाखल करणार आहेत. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सपत्नीक नितीन गडकरी यांच्या घरी गेले. यावेळी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव हे सुद्धा उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचे यावेळी औक्षण केले. त्यानंतर संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात झाली. दरम्यान, भाजप कारकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळात आहे. हे वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'भाजपा' च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये रोहिणी खडसे यांची वर्णी; विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना डिच्चू

ANI चे ट्वीट-

विधानसभा निवडणूक 2014 साली भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार टक्कर झाली होती. या लढतीत मोदी लाटेने काँग्रेसचा विजय रोखला होता. विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मोदी लाट पाहायला मिळवणार? तसेच काँग्रेसला या निवडणुकीत मोठे मिळवणार? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif