Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! पुढील आठवड्यात BMC 10 ते 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्याची शक्यता

दुर्दैवाने राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Mumbai Water Cut: मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणी कपातीला (Water Cut) सामोर जाव लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Municipal Corporation) पुढील आठवड्यात 10 ते 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबईला पिण्यायोग्य पाणी पुरवठा करणार्‍या सात तलावांमधील साठा 12.76 टक्क्यांवर घसरला आहे, ज्याची पातळी दररोज 0.43 दशलक्ष लिटरने घसरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील मान्सून उशिरा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार आहे.

बीएमसीनेही राज्य सरकारशी संपर्क साधून मान्सूनच्या आगमनापर्यंत परिस्थितीवर मात करण्यासाठी राखीव पाणीसाठा सोडण्याची विनंती केली आहे. दुर्दैवाने राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यापासून हायड्रोलिक विभागाचे अभियंते नियमितपणे मंत्रालयाच्या फेऱ्या मारत आहेत, मात्र या पुलाखालून अद्याप पाणी वाहून गेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा - Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची जलपातळी घटली, Vaitarna Dam मध्ये केवळ 10% पाणी)

राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी पाण्याचा साठा आहे. मात्र, बीएमसी राज्य सरकारच्या परवानगीशिवाय हा साठा वापरू शकत नाही. बीएमसीने आधीच राज्य सरकारशी संपर्क साधला आहे आणि दोन्ही तलावांमधून किमान 150 दशलक्ष घनमीटर (MCM) पाणी वापरण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाला पत्र लिहून नंतर कोकण विभागाला पाठवण्यात आले, मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. नागरी हायड्रोलिक विभागाचे अभियंते या प्रक्रियेत व्यस्त आहेत. अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, मोडकसागर, तानसा, भातसा आणि विहार हे सात तलाव मुंबईला पाणीपुरवठा करतात. या तलावांची एकूण क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे, ज्याचा वापर वर्षभर करता येईल.

मुंबईला दररोज 4,400 एमएल पाण्याची गरज असते. पण प्रत्यक्षात बीएमसी मुंबईला फक्त 3,850 एमएल पाणी पुरवते. पाण्याची गळती आणि पाण्याचे बाष्पीभवन ही तलावांमधील पाण्याची पातळी कमी होण्याची काही कारणे आहेत.