मुंबई: इंटरमिडियेट आर्टची प्रश्नपत्रिका लीक केल्याने शिक्षकाला अटक

या शिक्षकाने इंटरमिडियेट आर्ट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

Representational Image (Photo Credit: ANI)

मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एका महाविद्यालयाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाने इंटरमिडियेट आर्ट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शिक्षकाने गेल्या सप्टेंबर मध्ये पेपर परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी व्हॉट्सअॅपवर लीक केल्याचे सांगण्यात आले आहे. अमित पोरे (41) असे शिक्षकाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत अन्य शिक्षकाला सुद्धा अटक करण्यात येणार आहे.(UPSC Civil Services Examination 2019 Results: यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर; देशार प्रदीप सिंह अव्वल, 'इथे' पाहा मेरिट लिस्ट)

कला संचालनायाचे पदाधिकारी यांनी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर मिळाली. तपासातून असे समोर आले की, सील केलेल्या खुप प्रश्नपत्रिका होत्या. परंतु त्याचे सील काढुन ते पुन्हा सील करण्यात आल्याचा प्रकार चेंबूरच्या या महाविद्यालयात घडला आहे. परंतु सील उघडतानाच्या घटनेवेळी दोन पेपर सील करणारे इनचार्ज सुद्धा तेथे असल्याचे सांगण्यात आले आहे.(MPSC Exam: राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 आता 20 सप्टेंबरला होणार- महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

दरम्यान,यंदाच्या वर्षात 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर मराठी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना जळगाव मधील मुक्ताईनगर मधील असल्याचे समोर आले होते.  पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारसह शिक्षण विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतात. परंतु तरीही असे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसूनच येते.  अशा प्रकरणींमध्ये आरोपींना अटक ही करण्यात आली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली आहे त्यांचे कष्ट व्यर्थ जात असल्याचे अनेकांनी ही म्हटले आहे.