मुंबईतील सर्वात श्रीमंत अशा GBS मंडळाची गणेशोत्सवासाठी मुर्ती 14 फुट सकारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी

तर जीएसबी सेवा मंडाळाने येत्या गणेशोत्सवासाठी गणेशाची मुर्ती 14 फुट साकारण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे

GSB Seva Mandal Ganpati (Photo Credits-Facebook)

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून ओखळ असणाऱ्या किंग्स सर्कल )King's Circle)  येथील जीएसबी (GSB)  सेवा मंडळाचा उल्लेख केला जातो. तर जीएसबी सेवा मंडाळाने येत्या गणेशोत्सवासाठी गणेशाची मुर्ती 14 फुट साकारण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. परंतु मुंबईतील बहुतांश गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुर्ती 4 फुट पर्यंत साकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.(Ganeshotsav 2020: मुंबई मध्ये लालबागचा राजा मंडळ यंदा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सह आरोग्य उत्सव आयोजित करणार)

जीएसबी किंग्स सर्कल यांच्याकडून गणेशोत्सवाच्या दिवशी पाच दिवसांचा हा सण साजरा करण्यात येतो. या मंडळाचे ट्रस्टी आर जी भगत यांनी असे म्हटले आहे की, यंदा त्यांचा 66 वा गणेशोत्सव येत्या 22 ऑगस्ट ते 26 दरम्यान पार पडणार आहे. आमचे एकच दैवत असून आम्ही मुर्तीची जेवढी उंची असते ती खाली करु शकत नाही. गणपतीचा मुकुट आणि खालील भागच 18 फुटांचा असतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गणपती मुर्तीसाठी जी उंची आहे त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच गणपतीची मुर्ती कृत्रिमरित्या उभारण्यात आलेल्या डबक्यातच विसर्जन करण्यात येईल. मात्र गणपतीची विसर्जन मिरवणूकीसह भाविकांना सुद्धा परवानगी देण्यात येणार नाही आहे.(Ganesh Chaturthi 2020: 'उंची नाही तर भक्ती महत्त्वाची, मूर्ती 4 फुटापर्यंत असावी', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन) 

मात्र जर राज्य सरकारने यासाठी परवानगी दिल्यास अन्य मंडळी सुद्धा यासाठी मागणी करतील असे महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दाभीवकर यांनी म्हटले आहे. राज्यातील कोरोनाचे महासंकट पाहता यंदाच्या वर्षातील सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात येणार आहे. तर मुंबईत गणेशोत्सवावेळी मोठी धुम पहायला मिळते. परंतु कोरोना व्हायरसमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा प्रत्येक मंडळाने निर्णय घेतला आहे.