Rain In Mumbai: मुंबईतील बहुतांश ठिकाणी आज पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा, जाणून घ्या 7 जून पर्यंतसाठी हवामान खात्याचा अंदाज

विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rains (Photo Credits-ANI)

मे महिन्याच्या उकाड्याने नागरिकांना हैराण केल्यानंतर आज महाराष्ट्रातील मुंबईत पावसाने पहाटेच दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. हवामानात सुद्धा बदल होऊन थंडावा पसरला आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी पाऊस पडल्याचे दिसुन आले. यापूर्वी सुद्धा हवामान खात्याने येत्या 2 किंवा 3 जून पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली होती. आज ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.(अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता)

अखेर आजपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी सोशल मीडियात फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला. परंतु कोरोनामुळे यंदा पावसाचा आनंद घेण्यापासून नागरिक थोडे दूरच राहतील. तर आजपासून ते येत्या 7 जून पर्यंतच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Nisarga Cyclone: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 129 वर्षांनंतर जून मध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने भारतीय हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा)

>तर पहा 7 जून पर्यंत वातावरण कसे राहणार:

>1 जून: कमीत कमी तापमान 24.0 आणि कमाल तापमान 34.0 राहणार असून ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील

>2 जून: कमीत कमी तापमान 23.0 आणि कमाल तापमान 33.0 राहणार असून ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

>3 जून: कमीत कमी तापमान 22.0 आणि कमाल तापमान 32.0 राहणार असून ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस पडणार

>4 जून: कमीत कमी तापमान 22.0 आणि कमाल तापमान 32.0 राहणार असून ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस पडणार

>5 जून: कमीत कमी तापमान 23.0 आणि कमाल तापमान 33.0 राहणार असून ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार

>6/7 जून: या दोन्ही दिवशी कमीत कमी तापमान 24.0 आणि कमाल तापमान 34.0 राहणार असून पाऊस पडण्याची शक्यता

Rain Time Table (Photo Credits-Twitter)

तर मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे सुद्धा आज पाऊस पडल्याची छायाचित्रे ANI यांच्याकडून झळकवण्यात आली आहेत.(Mumbai Rains: मुंबई शहरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी; Nisarga चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अलर्ट जारी)

येत्या 2 -3 दिवसात पश्चिम किनार पट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. परंतु यासाठी नागरिकांसह यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत मच्छिमारांनी सुद्धा पुढील 4 दिवस समुद्रात जाऊ नये असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.