Mumbai Rains: 'त्यांना आधीच सावध केले होते' मुंबईतील दुर्घटनेवर महापौर किशोर पेंडणेकर यांची पहिली प्रतिक्रिया

या दुर्घटनेत जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

मुंबईत (Mumbai) रात्रभर झालेल्यामुळे मुसळधार पावसामुळे चेंबूर (Chembur), विक्रोळी (Vikholi) आणि भांडूप (Bhandup) या तीन ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त लोकांना आधीच या धोक्याविषयी सावध करण्यात आले असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

या घटनांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेनंतर किशोरी पेडणेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या अहवालानुसार, दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांना तीन वेळा सावध करण्यात आले होते. परंतु, लोक घरे सोडून बाहेर पडायला तयार नव्हते. महत्वाचे म्हणजे, अशावेळी महानगरपालिकेचे अधिकारी किंवा इतर कोणत्याही संस्था कारवाई करण्यास गेल्यावर स्थानिक लोक विरोध दर्शवतात. चेंबूर भागातही असाच प्रकार घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्या ठिकाणीही महापालिकेचे अधिकारी तीन वेळा गेल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Monsoon Forecast: मुंबई सह कोकणातील जिल्ह्यांना पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबईच्या चेंबूर परिसरातील वाशिनाका येथील भारत नगरच्या मागे भाभा अणु संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सीमेच्या भिंतीचा एक भाग कोसळला आहे. ज्यात अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली आल्याने 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच विक्रोळीतही रॉक स्लाइडमुळे इमारत कोसळली असून आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडुपमध्येही पंपिंग स्टेशनच्या भिंतीचे काही भाग कोसळले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या या तीन दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, मृतांच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.