मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त कोण असणार आघाडीवर? जाणून घ्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.
Mumbai North-Central Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) उमेदवार प्रिया दत्त (Priya Dutt), शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, आघाडीसाठी प्रतिकुल अंदाज दर्शवले आहेत. याच पार्श्वभुमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.
जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स
मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार प्रिया दत्त आणि पुनम महाजन यांच्यामध्ये लढत रंगली होती. दरम्यान या दिवशी महाराष्ट्रात 57 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. 2014 साली आलेली मोदी लाट आणि दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन यांची मुलगी या दोन्ही गोष्टींचा फायदा पूनम महाजन यांना झाला. काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा सुमारे 2 लाख मतांनी त्यांनी पराभव देखील केला होता.(Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार)
चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 17 मतदारासंघामध्ये मतदान घेण्यात आले. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपवल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन कोणाच्या बाजूने जनमताचा कौल लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.