Mumbai News: उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची 11 तासांपेक्षा जास्त ED चौकशी
रिअल इस्टेट आणि उद्योगपती हिरानंदनी ग्रुपचे बिल्डर निरंजन हिरानंदानी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनायच्या (ईडी) फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट फेमा उल्लंघन प्रकरणाबाबत त्यांचे चौकशी केली.
Mumbai News: रिअल इस्टेट आणि उद्योगपती हिरानंदनी ग्रुपचे बिल्डर निरंजन हिरानंदानी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनायच्या (ईडी) फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट फेमा उल्लंघन प्रकरणाबाबत त्यांचे चौकशी केली. सोमवारी सुटका होण्यापूर्वी ईडीने त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी एजन्सीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजल्यापासून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यानंतर रात्री 10.30 वाजता चौकशी संपली. हेही वाचा- रोहित पवार यांची आज ईडी चौकशी; कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी मुंबई मध्ये दाखल
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सीने गेल्या महिन्यात मुंबई आणि आसपासच्या हिरानंदानी ग्रुपच्या परिसरात झडती घेतली होती. शोध घेतल्यानंतर एजन्सीने हिरानंदानी आणि त्यांचा मुलगा दर्शन यांना चौकशीसाठी बोलावले. ईडीच्या चौकशीनंतर हिरानंदनी यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आम्ही त्यांनी चौकशीसाठी सहकार्य करत आहोत.
ईडीच्या तपासातून असे आले की, हिरानंदानींनी 2006 ते 2008 दरम्यान ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमद्ये किमान 25 कंपन्या आणि ट्रस्ट स्थापन केल्याचे आढळून आले. हिरानंदानी आणि त्यांचे कुटुंबीय हे ऑफ शोअर ट्रस्टचे लाभार्थी होते, ज्यांनी USD 60 दशलक्ष पेक्षा जास्त मालमत्ता जमा केली होती, एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले. आयकर विभागाने दोन वर्षांपूर्वी पासून मुंबई, बेंगळूरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये असलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या जवळपास २५ ठिकाणांवर छापे टाकले होते.