ट्रेन चालकाची हुशारी, डोळ्यात मिर्ची पावडर जाऊनही अर्धा तास ट्रेन चालवली
त्यावेळी काही समाज कंटकांनी चक्क ट्रेन चालकाच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून पळ काढल्याची घटना घडली खरी. मात्र ट्रेन चालकाने परिस्थितीशी दोन हात करत लोकल सुरु ठेवत प्रवाशांचा जीव वाचवले.
Mumbai: मुंबईत कळवा (Kalwa) रेल्वेस्थानकावरुन लोकल पुढे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी काही समाज कंटकांनी चक्क ट्रेन चालकाच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून पळ काढल्याची घटना घडली खरी. मात्र ट्रेन चालकाने परिस्थितीशी दोन हात करत लोकल सुरु ठेवत प्रवाशांचा जीव वाचवले. परंतु स्वत:चा जीवाची परवा न करता लोकल सुरु ठेवत ती 18 किमी पर्यंत पुढे घेऊन गेला. यामुळे सध्या या मोटरमनची कौतुक केले जात आहे.
मोटरमन लक्ष्मण सिंह असे त्याचे नाव आहे. शनिवारी सीएसटी-टिटवाळा (CST-Titwala) लोकलमध्ये सिंह यांची पोस्टिंग केली होती. त्यावेळी कळवा आणि मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या दरम्यान काही समाज कंटकांनी अचानकपणे येऊन दुपारी 3.40 वाजताच्या सुमारास मोटरचालकाच्या केबिनमध्ये मिर्ची पुड फेकण्याचा संताप जनक प्रताप केला. हवेमुळे सिंह यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकली पण लोकलचा ताशी वेग 95 किमी होता. परंतु समोर आलेल्या परिस्थितीशी घाबरुन न जाता सिंह यांनी लोकल सुरु ठेवत मुंब्रा स्थानकापर्यंत आणली. तर याबाबत सिंह यांना सांगितले असता, पश्चिम रेल्वेवर बंदमुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीन होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रसांगवधानपणे मी लोकल सुरु ठेवल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-बेफिकीर तरूणाने मजे-मजेत WIFI चं नाव ठेवलं 'Lashkar-E- Taliban', कल्याणमध्ये भीतीचं वातावरण)
तर सिंह यांच्यावर सध्या कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या डोळ्यांना गंभीर जखम झाली असल्याची माहिती रेल्वे डॉक्टरांनी दिली आहे. त्याचसोबत सिंह यांना पूर्णपणे बरे वाटेपर्यंत आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.