मुंबई: म्हाडात स्वस्त दरात घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, पोलीस शिपायाला अटक

मुंबईच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून जवजवळ 10 लाख रुपयांचा गंडा नागरिकांना लावल्याची बाब उघडकीस आली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

म्हाडा (MHADA) मध्ये स्वस्त दरात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून जवजवळ 10 लाख रुपयांचा गंडा नागरिकांना लावल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपायासोबत अन्य दोणजण सुद्धा सहभागी आहेत. परंतु यामधील एकजण फरार असून त्याचा तपास केला जात आहे. तर या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिसांकडून केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रकाश पाडावे असे आरोपीचे नाव आहे. त्याने नागरिकांकडून म्हाडात स्वस्तात घरे देतो असे सांगत 10 लाख रुपये उकळले आहेत. तक्रारदाराला म्हाडाचे आणि उपजिल्हाधिकारी मुलुंड मधील खोटे कागपत्रे बनवून दिले बोती. या प्रकरणी 12 फेब्रुवारीला भोईवाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 2 मार्चला आरोपी प्रकाश पाडावे याला अटक करण्यात आली आहे. पाडावे याची यापूर्वी नायगाव येथे ऑनड्युटी असताना अग्निशस्र चोरुन विकल्याच्या आरोपाखाली हकालपट्टी केली होती. आरोपीच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.(मुंबई: पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून व्यवसायिकांची फसवणूक; टोळी गजाआड)

तसेच काही दिवसांपूर्वी लष्करातील माजी सैनिकाच्या मुलाल मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना ठाण्याची असून पोलिसांकडून दोन जणांना अटक करम्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींनी ही अनेकांची फसवणूक केल्याचे तपासातून समोर आले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif