इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम 2020 रोजी पूर्ण होणार- देवेंद्र फडणवीस

बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचे काम 2020 रोजी पूर्ण होणार असल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

इंदू मिल (Indu Mill) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचे काम 2020 रोजी पूर्ण होणार असल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. कुलाबा येथे आयोजित केलेल्या अखंड भीम ज्योत प्रज्वलानाच्या कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी याबद्दल सांगितले आहे.

भाजप (BJP) आमदार राज पुरोहित यांच्या प्रयत्नामुळे कुलाबा ( येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड भीम ज्योत उभारण्यात आली. त्यावेळी फडणवीस यांनी असे म्हटले की, आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर सरकार नेहमीच काम करत आहे. तसेच आंबेडकर यांची आठवण कायम राहावी यासाठी सरकारने त्यांचे लंडनमधील घर आणि इंदू मिल मधील स्मारक पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2020 मध्ये इंदू मिल येथील जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. (हेही वाचा-निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल: राज ठाकरे)

तर आमदार पुरोहित यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या भीम ज्योत परिसरात भव्य तिरंगा सुद्धा उभारण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी देशभरातील अनुयायी येतील अशी अपेक्षा बाळगली जात आहे.