Mumbai Local Updates: 16 जून पासून मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये टीसी देखील करणार प्रवास

प्रवाशांकडून फर्स्ट क्लास मध्ये वैध तिकीट नसलेले अनेक प्रवासी प्रवास करतात त्यामुळे तिकीट काढून जाणार्‍यांना गर्दीत चढता येत नसल्याची, चढल्यास बसायला मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

Ticketless Travel Concerns in Mumbai Local: मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वी मध्या रेल्वेच्या  मेन लाईन वर मुंब्रा येथे गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून काही लोकांचा मृत्यू झाला. यानंतर मध्य रेल्वेने 16 जून पासून फर्स्ट क्लास मध्ये नियमित टीसी देखील प्रवास करणार असल्याचं सांगितलं आहे. खास पथकं यासाठी तैनात केली जाणार आहेत. रेल्वेमध्ये ऑफ पीक म्हणजे गर्दी नसलेल्या वेळेत टीसी कोणत्याही स्थानकात चढून तिकीट तपासणार आहेत. दरम्यान

HT च्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये 10-15 पथके असतील आणि प्रत्येक पथकात कोणत्याही वेळी 7-8 टीसी असण्याची अपेक्षा आहे, जे कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, अंबरनाथ, डोंबिवली आणि कल्याण येथून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) साठी सुटणाऱ्या जलद रेल्वे सेवांवर लक्ष केंद्रित करतील. नक्की वाचा: AC Locals With Auto Doors For Mumbai: भाडेवाड न करता मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

पथकांना अनियमित प्रवाशांना जागीच पकडण्याचे आणि ट्रेनमध्येच दंड वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पैसे न भरल्यास, अशा प्रवाशांना पुढील नियोजित स्थानकावर सोपवले जाईल, जिथे स्टेशन-आधारित टीसी कर्मचारी ताब्यात घेतील आणि खटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील.

गेल्या दोन वर्षांत, मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी 2.948 दशलक्ष तिकीट नसलेल्या प्रवाशांना पकडले आहे आणि त्यांच्याकडून 158 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसी लोकलच्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी देण्यात आलेला एक खास व्हॉट्सअॅप नंबर मे महिन्यापासून कार्यरत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement