मुंबई-हार्बर रेल्वे विस्कळीत : खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली
मात्र, त्याचा नियमीत वाहतुकीवर फारसा परिणाम दिसून येत नाही.
मुंबई रेल्वे हार्बर मार्गावरील खांदेश्वर (Khandeshwar) ते मानससरोवर (Mansarovar) या स्टेशनदरम्यान रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. सेवा विस्कळीत झाल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हार्बर रेल्वे किंवा मुंबई रेल्वे प्रशासनाकडून मात्र या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.
प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहमीच्या वेळेपेक्षा रेल्वे काही मिनीटे उशिराने धावत आहे. मात्र, त्याचा नियमीत वाहतुकीवर फारसा परिणाम दिसून येत नाही.
दरम्यान, रेल्वे वाहतूक सेवेतील विस्कळीतपणा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन रविवारी मेगाब्लॉक घेत असते. मात्र, तरीही अनेकदा रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा अनुभव प्रवाशांना येतो.