Mumbai Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मुंबईत 4 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्य विसर्जन २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण कालावधीत मंडळांना नियमांचे पालन करून लाऊडस्पीकर वापरता येणार आहे.

Loud Speaker

मुंबई मध्ये गणेशोत्सवाच्या काळात संंपूर्ण शहरात धामधूमीचं वातावरण असते. भक्तीपूर्ण वातावरणामध्ये भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी एकत्र येतात.  यंदाच्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना प्रशासनाकडून  मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश  उत्सवाच्या कालावधीत यंदागणेशोत्सवात दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर व लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र ही परवानगी ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. नक्की वाचा: Ganeshotsav 2026 Dates: यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारण.  

गणेशोत्सवात लाऊडस्पीकरला कधीपर्यंत परवानगी?

गणेशोत्सव हा राज्य सरकारने 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ठराविक दिवसांसाठी रात्री उशिरापर्यंत स्पीकर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. गणेशोत्सवात गणेशोत्सवासाठी चार दिवस दिले आहे. त्यात दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी १५ सप्टेंबर ऑगस्ट, पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी १८ सप्टेंबरचा दिवस, गौरी विसर्जनासाठी १९ सप्टेंबरचा दिवस आणि अनंत चतुर्दशीसाठी २५ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत स्पीकर व लाऊडस्पीकर  वापरण्यास प्रशासनाकडून दरवर्षी अशा प्रकारची विशेष परवानगी दिली जाते.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्य विसर्जन २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण कालावधीत मंडळांना नियमांचे पालन करून लाऊडस्पीकर वापरता येणार आहे.

नियमांचे पालन बंधनकारक

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० आणि त्यातील २०१७ च्या सुधारित तरतुदींनुसार मर्यादित आवाजातच ध्वनीक्षेपकांचा वापर करावा, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारही ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषण नियमांतील तरतुदीनुसार, पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही ध्वनीक्षेपक यंत्रणेचा वापर करता येणार नाही. तसेच मंडप किंवा तत्सम रचना उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मंडळांची भूमिका आणि प्रशासनाची तयारी

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीने यापूर्वीच ध्वनीक्षेपक वापरण्याचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंडळांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत फटाके आणि लाऊडस्पीकरच्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रार निवारणासाठी यंत्रणा

ध्वनी प्रदूषणासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका क्षेत्रात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार नोंदवता यावी, यासाठी ही व्यवस्था उभारण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तसेच व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

गणेशोत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement