लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात बसल्याने महिलांमध्ये जुंपली, पोलीस महिलेचा घेतला चावा

मात्र जर महिलांमध्ये भांडण झाल्यास त्या शांत राहण्याचे नाव घेत नाहीत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईच्या (Mumbai) लोकलमधील भांडणे ही नेहमीच पाहायला मिळतात. मात्र जर महिलांमध्ये भांडण झाल्यास त्या शांत राहण्याचे नाव घेत नाहीत. असाच एक प्रकार लोकलमध्ये घडला असून चक्क महिलेने फर्स्ट क्लासच्या डब्यात पोलिस महिला बसली म्हणून तिच्यासोबत गैरवर्तवणुक करण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिड-डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार,वडाळा येथून सीएसएमटीकडे जाण्यासाठी लोकल निघाली होती. त्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात महिला पोलिस बसल्या होत्या. तसेच महिला पोलिसाची त्याचवेळी ड्युटी चुनाभट्टी येथे लावण्यात आली होती. मात्र फर्स्ट क्लासमध्ये बसलेल्या एका महिलेनेने पोलिस महिलेला तुम्ही गणवेशात असताना फर्स्ट क्लासने कसा काय प्रवास करता यावरुन विविध प्रश्न विचारु लागले. तसेच या दोघींमध्ये वाद सुद्धा झाले. त्यानंतर महिला पोलिसाने त्या महिलेला पोलिस स्थानकात चल असे खडसावले.(मुंबई: आसनगाव येथे धावत्या एक्स्प्रेसखाली सापडूनही प्रवासी सुखरुप Viral Video)

परंतु महिलेने पोलिसात जाण्यासाठी नकार दिला. तरीही महिला पोलिसाने तिला पोलिसात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महिलेने पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.