IPL Auction 2025 Live

मुंबईत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कार, बाईक रजिस्ट्रेशन मध्ये 30 टक्यांनी वाढ

मुंबईत जवळजवळ 30 टक्क्यांहून अधिक बाइक्स, कारचे रजिस्ट्रेशन झाल्याची अधिक माहिती वाहतूक ऑफिसेस यांच्याकडून देण्यात आली आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशभरासह राज्यात काल (25 ऑक्टोंबर) विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करण्यात आला. कोरोनाच्या परिस्थितीचे भान राखत नागरिकांकडून मोठ्या आनंदासह उत्सावात दसऱ्याचा सण पार पडला. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याचा शुभमुहूर्त साधत नागरिकांकडून काल कार, बाइकची खरेदी अधिक प्रमाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत जवळजवळ 30 टक्क्यांहून अधिक बाइक्स, कारचे रजिस्ट्रेशन झाल्याची अधिक माहिती वाहतूक ऑफिसेस यांच्याकडून देण्यात आली आहे.(Hero Splendor Plus आणि Hero Glamour वर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या यामधील कोणती बाइक तुमच्यासाठी ठरेल दमदार)

रविवारच्या संध्याकाळ पर्यंत एकूण 609 नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले. हा आकडा मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली येथील आहे. तर गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्ये 469 गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते.आरटीओच्या डेटा मधून असे सांगितले गेले आहे की, 404 गाड्या या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रजिस्ट्रेशन करण्यात आल्या. तर गेल्या वर्षात एकूण 308 गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षात वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जी गेल्या वर्षात 161 वरुन 205 वर पोहचली आहे.

सर्वसाधारणपणे 125 कार, 400 टू-व्हिलर्सचे दर दिवशी मुंबईत रजिस्ट्रेशन केले जाते. तर कोरोनाच्या काळात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करण्याऐवजी खासगी वाहनांनी कार्यालयात पोहचण्यासाठी वापर करत असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या)

दरम्यान, सणासुदीचे दिवस जवळ आल्याने कार निर्मात्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ऑफर्स देत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा सणासुदीच्या दिवसात कार किंवा एखादी नवी बाइक खरेदी करायची असल्यास ही उत्तम संधी ठरु शकते.