मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचे COVID19 मुळे निधन
खैरनार यांना कोरोनाची लागण झाली होती. खैरनार यांच्याकडे वांद्रे पूर्व मधील एच ईस्ट वॉर्ड विभागाचे अधिकारी होती.
कोरोनाच्या विरोधात लढाई लढत असलेल्या महापालिकेच्या सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचे निधन झाले आहे. खैरनार यांना कोरोनाची लागण झाली होती. खैरनार यांच्याकडे वांद्रे पूर्व मधील एच ईस्ट वॉर्ड विभागाचे अधिकारी होती. 57 वर्षीय अशोक खैरनार यांना एका आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे खैरनार यांना उपचारासाठी गुरुनानक रुग्णालयानंतर सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु शुक्रवारी खैरनार यांना फोर्टिस रुग्णालयात आणल्यानंतर त्यांचे आज निधन झाले आहे.(महाराष्ट्रात आज COVID19 च्या आणखी 8139 रुग्णांची भर तर 223 जणांचा बळी; राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 वर पोहचला)
अशोक खैरनार हे वांद्रे पूर्व मधील एच ईस्ट वॉर्डातील असून तेथे रुग्णांचा आकडा वाढत होता. खैरनार यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तेथे नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. खैरनार यांनी कोरोनाचा दुप्पटीने वाढणाऱ्या वेग कमी करण्यात सुद्धा यश मिळवले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला सुद्धा एच ईस्ट वॉर्डमध्ये येतो. यामध्ये वांद्रे पूर्वसह खारचा सुद्धा समावेश होते. येथे लोकसंख्या 6 लाखांहून अधिक आहे.(Dharavi Model: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom यांनी कौतुक केलेलं 'धारावी मॉडेल' नेमकं काय? आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी कशी मिळवतेय COVID 19 वर नियंत्रण)
बेहरामपाडा, गोलिबार, शास्रीनगर, भरतनगर, वाकोला येथे दाटीवाटीने लोकसंख्या आहे. या क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये रुग्णांचा आकडा 3700 च्या पार गेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 2800 जणांची प्रकृती सुधारली आहे. मुंबईतील एच ईस्ट मध्ये दिवसातील रुग्ण दर पाहता 0.5 टक्के आहे. याच कारणामुळे रुग्णांच्या दुप्पटीचा आकडा शंभर दिवसांपेक्षा अधिक आहे. सध्या हा दर 134 दिवसांवर पोहचला आहे. यापूर्वी महापालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे सुद्धा कोरोना व्हायरसमुळे निधन झाले होते.