Mumbai: भांडूप, पवई आणि कांजूरमार्ग येथील अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने 19 एप्रिल पासून 'या' वेळेत सुरु राहणार
परंतु ही दुकाने भांडूप, पवई आणि कांजूरमार्ग येथील असतील आणि त्यांना येत्या 19 एप्रिल पासून त्यासाठी परवानगी दिली गेली आहे.
Mumbai: शहरातील सर्व अत्यावश्यक सेवासुविधांची दुकानांसह आता मेडिकल स्टोर सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. परंतु ही दुकाने भांडूप, पवई आणि कांजूरमार्ग येथील असतील आणि त्यांना येत्या 19 एप्रिल पासून त्यासाठी परवानगी दिली गेली आहे. महापालिकेच्या एस वॉर्डसाठी शनिवारी जाहीर केलेल्या निवदेनात असे म्हटले होते की, अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने दुपारी 12 वाजता बंद करावीत. फक्त मेडिकल स्टोअर्स सुरु राहतील असे स्पष्ट करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
नागरिकांची दिवसभर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि आमदारांनी ही मागणी केली होती. मात्र सर्व मीडिया स्टोअर्स पूर्णवेळ चालू राहणार आहेत. फक्त त्यांना होम डिलिव्हरी आणि ऑनलाईन डिलिव्हरी करता येणार आहे. असे सहाय्यक महापालिका आयुक्त विभास आचरेकर यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीचे नियम येत्या 30 एप्रिल पर्यंत रस्त्यालगतच्या फळ विक्रेत्यांसाठी लागू केले जाणार आहेत.(ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची 'Oxygen Express' धावणार, उद्या कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने एक्सप्रेस होणार रवाना)
तसेच सुपरमार्केट्स डी-मार्ट, हायको यांना सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात विचारण्यात आले आहे. सर्व रेस्टॉरंट्स आणि बार यांना फक्त होम डिलिव्हरची सुविधा दिली गेली असल्याचे आचरेकर यांनी पुढे म्हटले आहे. एस वॉर्डमध्ये कन्नमवर नगर, पवई, कांजूरमार्ग, नरदास नगर, पवई-विहा कॉम्प्लेक्स, सर्वोदय नगर आणि ठेंभीपाडा यांचा समावेश आहे.(मुंबई पोलिसांकडून Color Code पास अत्यावश्यक सेवासुविधांसाठी जाहीर, गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल- हेमंत नगराळे)
दरम्यान, गेल्या आठवड्यात महापालिकेकडून नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार फूड डिलिव्हरी आणि अत्यावश्यक गोष्टींच्या पुरवठा करणाऱ्या सप्लायर्सला 24 तास नागरिकांना सुविधा देण्याची परवानगी दिली होती. त्याचसोबत डोळ्याचे वैद्यकिय दवाखाने आणि चष्म्याची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.