मुंबई: बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न; आरोपीं अटकेत

मुंबई येथील काशीमिरा परिसरात ही घटाना घडली.

Fire | (Photo Credits: Pixabay)

वर्धा (Wardha) आणि औरंगाबादनंतर (Aurangabad) आता मुंबईतही (Mumbai) एका तरूणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई येथील काशीमिरा परिसरात ही घटाना घडली. या घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर भाईंदरच्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने 2 आरोपींनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वर्धा येथील घनटनेची बातमी ताजी असताना औरंगाबाद येथील महिलेवर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मुंबईतही महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित तरुणी रात्री घरी जात होती. तेव्हा तिचा पाठलाग करत मोटार सायकलवरून 2 आरोपी आले आणि तिला बलात्कार गुन्हा मागे घेण्यास सांगितला. मात्र, तिने त्याला नकार दिला म्हणून आरोपीने रागाने ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळल्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडित तरूणीचा आवाज ऐकून आजूबाजुच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमा जाले. त्यानंतर पीडित तरूणीला भाईंदरच्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे. हे देखील वाचा- जालना येथे मारहाण झालेल्या प्रेमी युगलांनी केले लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

महिलेवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याआधी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भररस्त्यात जिंवत जाळल्याची घटना ताजी असताना औरंगाबाद येथेही एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.