Bus Driver Watching Cricket Match While Driving: गाडी चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामना पाहणं बस चालकाला पडलं महागात; MSRTC कडून ड्रायव्हर बडतर्फ

एका प्रवाशाने चालकाचा गाडी चालवत असताना सामना पाहतानाचा व्हिडिओ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला होता. त्यानंतर परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

MSRTC Bus प्रतिकात्मक प्रतिमा | (File Image)

Bus Driver Watching Cricket Match While Driving: गाडी चालवताना मोबाईल फोनवर क्रिकेटचा सामना पाहणं एका चालकाला चांगलचं महागात पडलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) रविवारी या प्रकरणी बस चालकाला (Bus Driver) बडतर्फ केलं. एका प्रवाशाने चालकाचा गाडी चालवत असताना सामना पाहतानाचा व्हिडिओ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला होता. त्यानंतर परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये घडली घटना -

प्राप्त माहितीनुसार, 22 मार्च रोजी मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये ही घटना घडली. बसमधील एका प्रवाशाने चालकाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो परिवहन मंत्र्यांना पाठवला. तथापि, प्रवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला. यामध्ये प्रवाशाने मुख्यमंत्र्यांना देखील टॅग केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनी तातडीने एमएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चालकावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा -Policeman Assaults PMPML Bus Driver: पोलिस कर्मचाऱ्याची पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ)

या निर्देशानंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल एका खाजगी बस ऑपरेटरने नियुक्त केलेल्या चालकाला बडतर्फ केले आणि सेवेसाठी जबाबदार असलेल्या खाजगी कंपनीला 5 हजार रुपये दंड ठोठावला. तथापि, परिवहन मंत्री म्हणाले की, 'ई-शिवनेरी ही मुंबई-पुणे मार्गावरील एक महत्त्वाची सेवा आहे. या बसमधून अनेक लोक प्रवास करतात. ही सेवा अपघातमुक्त म्हणून ओळखली जाते. बेपर्वाईने वाहने चालवणाऱ्या आणि प्रवाशांना धोका निर्माण करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.' (हेही वाचा -School Bus Driver Dies By Heart Attack: स्कूल बस चालकाला गाडी चालवताना अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी वाचवले 20 शाळकरी मुलांचे प्राण)

यासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी शिस्तबद्ध वाहन चालविण्याची खात्री करण्यासाठी एमएसआरटीसी अंतर्गत कार्यरत खाजगी कंपन्यांमध्ये नियुक्त केलेल्या चालकांना नियमित प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. याशिवाय, ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे चालक वाहन चालवताना मोबाईल फोनवर सामने किंवा चित्रपट पाहतात, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक विभाग अशा चालकांसाठी नवीन नियम लागू करेल, असे परिवहन मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement