MSRTC चा मोठा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी बस लावणार अँटिमायक्रोबियकल केमिकल कोटिंग
त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अशातच आता एमएसआरटीसी यांच्याकडून एसटी बससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम असून तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अशातच आता एमएसआरटीसी यांच्याकडून एसटी बससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एसटी बस वर अँटिमायक्रोबियल केमिकलचे कोटिंग केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये जवळजवळ 10 हजार एसटी बसचा समावेश असणार आहे.(कोविड-19 तिसरी लाट, निर्बंध शिथिलीकरण यासंदर्भात काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या)
या विशेष रसायनाची फवारणी एसटी बसच्या बाहेर आणि आतमधून सुद्धा केली जाणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे विषाणू टिकून राहणार नाही असे सांगितले जात आहे. अँटिमायक्रोबिल केमिकल सारख्या रसायनांचा वापर कार्यालये किंवा एअरलाईन्समध्ये फवारणीसाठी वापरला जातो. यावर एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष शेखर चेन्ने यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याकडे पाठ वळवत आहे. मात्र बसवर ही जर फवारणी केल्यास नागरिकांमधील कोरोनासंदर्भातील भीती काहीश्या प्रमाणात दूर होईल.(MNS on Maharashtra Government: सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, अन्यथा रेलभरो आंदोलनाचा मनसेचा इशारा)
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू सकारात्मक दर कमी आहे, त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात यावेत अशी मागणी जोर धरत होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते की, 1% पेक्षा कमी साप्ताहिक कोविड पॉझिटिव्हिटी रेट किंवा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी दर असणाऱ्या जिल्ह्यांमधील नियमांमध्ये ढील दिली जाऊ शकते. त्यानुसार आता राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहणार आहेत.