Mitsubishi Electric Corporation महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारणार फॅक्टरी; 220 कोटी रूपयांची गुंतवणूक

अंतराळ विकास आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक आणि बांधकाम उपकरणे यामध्ये वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये Mitsubishi जागतिक आघाडीवर आहे.

Mitsubishi Electric Corporation महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारणार फॅक्टरी; 220 कोटी रूपयांची गुंतवणूक
Mitsubishi | PC: Twitter

Mitsubishi Electric Corporation महाराष्ट्रामध्ये आपली फॅक्टरी सेटअप करण्यासाठी 220 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. पुण्याजवळ ही फॅक्टरी उभारली जाणार आहे. त्याची उपकंपनी Mitsubishi Electric India इन्व्हर्टर आणि इतर फॅक्टरी ऑटोमेशन (FA) कंट्रोल सिस्टम उत्पादने तयार करेल, असे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या जपानी उत्पादकाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान ही फॅक्टरी डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. भारतामध्ये वाढती मागणी पाहता त्याची पूर्तता करण्यासाठी कंपनी काम करणार आहे. "वेगाने वाढणारी भारतीय बाजारपेठ सुमारे 8 टक्के वार्षिक दराने विस्तारत आहे, प्रामुख्याने ऑटोमोबाईल्स, अन्न आणि पेये, फार्मास्युटिकल्स, डेटा सेंटर्स आणि कापड उद्योगांमध्ये, भविष्यात आणखी बाजार विस्तार अपेक्षित आहे," असे त्यात म्हटले आहे. पुण्याजवळील फॅक्टरी दुमजली, 15,400 स्केअर मीटरची आणि 40 हजार स्क्वेअर मीटर वर विस्तारलेली असणार आहे.

याव्यतिरिक्त, सुविधेमध्ये उच्च कार्यक्षम वातानुकूलन प्रणाली आणि LED प्रकाश उपकरणे वापरून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करून कार्बन न्युट्रॅलिटी निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध वैशिष्ट्यांचा समावेश केला जाणार आहे. नक्की वाचा: Magnetic Maharashtra 2.0: राज्यात 90 हजार रोजगार, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक, 16 हजार कोटींचे करार, महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे .

Mitsubishi Electric Corporation ही जपानी कंपनी आहे. त्याचं मुख्यालय टोकियो मध्ये आहे. ही अंतराळ विकास आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक तंत्रज्ञान, ऊर्जा, वाहतूक आणि बांधकाम उपकरणे यामध्ये वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये जागतिक आघाडीवर आहे. मार्च 2022 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 4,476.7 अब्ज येन (USD 36.7 अब्ज) कमाई नोंदवली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2022 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).