MHADA Lottery 2024: म्हाडा घरांसाठी अर्ज, लॉटरी पाहण्यासाठी अधिकृत पोर्टलच वापरा; Fake Website Scams नंतर अधिकृत इशारा

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडे एक बनावट वेबसाइट शोधून काढली, ज्यामध्ये अनेक अर्जदारांची फसवणूक (MHADA Warns of Fake Website Scams) करण्यात आली आहे. म्हाडा (MHADA) अधिकाऱ्यांनी 13 ऑगस्ट रोजी अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली एक फसवी वेबसाइट ओळखली.

MHADA Scams | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

म्हाडा गृहनिर्माण लॉटरी 2024 (MHADA Lottery 2024) ही ऑनलाईन फसवणुकीमुळे चर्चेत आली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडे एक बनावट वेबसाइट शोधून काढली, ज्यामध्ये अनेक अर्जदारांची फसवणूक (MHADA Warns of Fake Website Scams) करण्यात आली आहे. म्हाडा (MHADA) अधिकाऱ्यांनी 13 ऑगस्ट रोजी अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली एक फसवी वेबसाइट ओळखली. या वेबसाईटच्या आधारे अनेक नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पुढे आले. या प्रकराचा तातडीने दखल घेत म्हाडाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. तसेच, राज्यातील पात्र नागरिकांनी म्हाडा घरांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर केला.

कसा उघड झाला घोटाळा

एका अर्जदाराने लॉटरीसाठी आधीच पैसे भरल्याचा दावा करत म्हाडा कार्यालयात भेट दिली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. तथापि, अर्ज सादर ( फॉर्म सबमिट) केल्यानंतर पेमेंट हा अंतिम टप्पा मानला जातो. त्यामुळे अर्जदाराचे पैसे म्हाडाकडे पोहोचले नव्हते मात्र तो म्हाडाला पैसे दिल्याचा दावा करत होता. इतकेच नव्हे तर, घोटाळेबाजांनी अर्जदाराला गोरेगाव पश्चिम येथील एका शो फ्लॅटवर नेऊन दाखवला. अर्जदाराचे म्हणने ऐकल्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यांना https://mhada.org ही बनावट वेबसाइट सापडली, जी https://mhada.gov.in या अधिकृत साइटची नक्कल करते. (हेही वाचा, Mhada Fake Website: सावधान! सायबर ठगांनी बनवली हुबेहुब म्हाडासारखीच वेबसाईट)

पैसे घेऊन फसवले

फसवणूक करणाऱ्या आरोपींनी पीडितांना आपणच म्हाडा असल्याचा दावा केला. त्यांनी पीडितांकडून पैसे घेतले त्यांना अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) असलेला डमी फ्लॅट दाखवला. इतकेच नव्हे तर हा फ्लॅट केवळ 30 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी पीडितेला बनावट वेबसाइटद्वारे 50,000 रुपये भरण्यासांगीतले. धक्कादायक म्हणजे अधिकृत लॉटरी सुरू होण्यापूर्वीच हे पेमेंट करण्यात आले. ज्याची पीडितेला फसवी पावती दिली. ज्यामुळे पीडितेला आपला व्यवहार कायदेशील असल्याची खात्री पटली. प्रत्यक्षात मात्र तिची फसवणूक झाली होती. (हेही वाचा, Mumbai Mhada House: म्हाडाची घरे परवडणार का? किमंत ऐकून मुंबईकरांना फुटला घाम)

म्हाडाचा अधिकृत इशारा

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी या घटनेनंतर जाहीर इशारा दिला आहे की, अर्जदारांनी अर्ज सादर करताना केवळ अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वपर करावा. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. म्हाडाने यावर भर दिला की फ्लॅट्सचे वाटप केवळ सुरक्षित, संगणकीकृत लॉटरी प्रणालीद्वारे, मानवी हस्तक्षेपाशिवाय केले जाते.

बनावट वेबसाइट कशी ओळखायची

बानवट वेबसाईट म्हाडाच्या अधिकृत पोर्टलशीसाधर्म्य दर्शवते. ही वेबसाईट सारखीच दिसत असली तरी, ती कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन तयार केलेली असते. म्हाडा सांगते की, अधिकृत वेबसाइटवर कोणतेही पेमेंट लिंक नाहीत. म्हाडा IHLMS 2.0 संगणकीकृत लॉटरी प्रणाली वापरते. जी कोणतीही देयके देण्यापूर्वी सुरक्षित दस्तऐवज पडताळणी आणि पात्रता तपासणी सुनिश्चित करते.

घोटाळ्यांपासून स्वतःचे रक्षण करा

म्हाडाने लोकांना सल्ला दिला आहे की, अनधिकृत वेबसाइट्सशी संपर्क साधणे किंवा अनधिकृत व्यक्तींसोबत वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. संस्थेने पुनरुच्चार केला की फ्लॅट विकण्यासाठी किंवा संबंधित कारवाई हाताळण्यासाठी एजंट, सल्लागार किंवा मध्यस्थांसोबत काम करत नाही. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती थेट म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी किंवा मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (मार्केटिंग) यांना द्यावी.