Marathwada Suicide Case: मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांची गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच दिवशी तीन तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Marathwada Suicide Case: छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच दिवशी तीन तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपुर्ण मराठवाडा विभाग हादरला आहे. तर बुधवारी या घटनेने मराठवाड्यात खळबळ उडाली. यापुर्वी महिन्याभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन ते चार तरुणांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. जालना येथील शिवाजी माने, छत्रपती संभाजीनगर येथीस गणेश कुबेर आणि हिंगोलतील लहू कल्याणकर यांनी आत्महत्या करून जीवन यात्रा संपवलं आहे.

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावातील तरुणाने आत्महत्या केली आहे. गावात साखळी उपोषणात सहभागी झालेला शिवाजी माने नैराश्यात येऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी ११ च्या दरम्यान ही घटना घडली. मुलांचे शिक्षण पुर्ण करू शकत नाही याचा ताण घेत गळफास घेतला. राज्य सरकारला वेळ देवून मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसल्याच्या नैराश्यात होता.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आपतगाव येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश कुबेर असं या तरुणाचे नाव होते. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने "जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका," असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. या घटनेमुळे गावकऱ्यांनी मोठी आपतगाव फाट्यावर रास्ता रोको करून टायर देखील पेटवून देण्यात आली आहे. तरुणाच्या पाश्चात पत्नी, आई- वडिल आणि मुलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले कित्येक दिवस तरुणाची घालमेल पाहायला मिळणार आहे, हिंगोलीतील तरुणाने गुरुवारी सकाळी चिठ्ठी लिहलं त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे. या घटनेमुळे गावात नैराश्याचे वातावरण झाले आहे. मयत तरुणाचे नाव लहु उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असे आहे. आरक्षणासाठी किती दिवस वाट पाहावी असा उल्लेख करत टोकाेचे पाऊल उचलले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif