मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण निराशाजनक असल्याचं सांगत विरोधाकांनी सभात्याग केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला असल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra Winter Session 2019 Day 4 Live News Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण निराशाजनक; विरोधाकांचा सभात्याग
16 डिसेंबर ते 21 डिसेंबर सुरू असणार्या या अधिवेशनाचा आज ( 19 डिसेंबर ) हा चौथा दिवस आहे. आजचं विधिमंडळ अधिवेशनचं प्रमुख आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहेत.
Nagpur Winter Session 2019 Day 4: महाविकास आघाडी सरकारचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर सुरू असणार्या या अधिवेशनाचा आज ( 19 डिसेंबर ) हा चौथा दिवस आहे. आजचं विधिमंडळ अधिवेशनचं प्रमुख आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहेत. काल (18 डिसेंबर) दिवशी विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीचं सरकार हे हाराकिरीचं सरकार आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळून देखील सरकार स्थापन करू न शकल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत बसले आहेत असे म्हणून त्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत बसले आहेत असे म्हणत टीका केली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्याच्या या सार्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Nagpur Winter Session 2019 Day 3: महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
यंदा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यांमुळे विशेष गाजले. त्यानंतर काल विधिमंडळाच्या तिसर्या दिवशी सभागृहात नागरिकत्व कायदा, नागपूर महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती.