Maharashtra: क्रुरतेची हद्दच पार! झोपलेल्या कुत्र्याला मुद्दामुन ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर नेले फरफटत, FIR दाखल
ऐवढेच नव्हे तर कुत्र्याला काही किलोमीटर पर्यंत ट्रकने धडक दिल्यानंतर फरफटत सुद्धा नेले आहे.
Maharashtra: महाराष्ट्रातील पुणे येथे एका ट्रक चालकाने कुत्र्याला मुद्दामुन धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐवढेच नव्हे तर कुत्र्याला काही किलोमीटर पर्यंत ट्रकने धडक दिल्यानंतर फरफटत सुद्धा नेले आहे. या प्रकरणी ड्रायव्हर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील चतुश्रिंगी पोलीस स्टेशन पेन क्लब रोडवर घडली आहे.(Pune: पुण्यातील गट शिक्षण अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, आरटीई मार्फत शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितले होते 'एवढे' पैसे)
या प्रकरमी अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट नीना राय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्या एफआयआर मध्ये आरोप लावत नीना शर्मा यांनी असे म्हटले की, एका शेड खाली झोपलेल्या रस्त्यावरील कुत्र्याला ट्रक ड्रायव्हरने धडक दिली. तर कुत्रा शेडच्या आतमध्येच झोपला होता.
एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून असे समोर आले आहे की, ड्रायव्हरने शेडच्या आतमध्ये झोपलेल्या कुत्र्याला पाहिले. तरीही त्याने त्याच्यावर गाडी चढवली आणि त्याला फरफटत नेले. जेव्हा लोकांनी आरडाओरड सुरु केली तेव्हा ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पळ काढला.(पालघर मध्ये 1.33 कोटीचे 157 घोळ मासे विकून मच्छिमार रातोरात झाला मालामाल)
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या प्रकरणी पोलीस अधिकारी जाकिर मनियार यांनी म्हटले, आमच्याकडे या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच या बद्दलचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आमच्याकडे आहेत. या व्यतिरिक्त ड्रायव्हरला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे सुद्धा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याला एका आठवड्याच्या आतमध्ये अटक केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.