ठाणे प्रशासनाने मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना धाडली तडीपारची नोटीस, कोर्टात नेत असताना कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी

परंतु त्यांना ठाणे कोर्टात घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पृष्पवृष्टी केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले.

Avinash Jadhav (Photo Credits-Facebook)

मनसे पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश यांच्या विरोधात तडीपारची नोटीस धाडण्यासह गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्यांना ठाणे कोर्टात घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पृष्पवृष्टी केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले. त्याचसोबत कार्यकर्त्यांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा नारे लगावले. जाधव यांच्या विरोधात काल ठाणे प्रशासनाकडून तडीपारची नोटीस धाडली होती. त्यानंतर अविनाश जाधव यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस स्थानकात नेण्यात आले. आहे. त्यानंतर आता जाधव यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 69 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 192 वर पोहोचली)

अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा पाच जिल्ह्यांमधून तडीपार होण्याची नोटीस धाडण्यात आली आहे. त्याचसोबत विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी जाधव यांना स्पष्टीकरण देण्याकरिता येत्या 4 ऑगस्टला विरार मधील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर कोविड रुग्णालयातून नर्स यांना कामवरुन काढून टाकले असता त्यावेळी आंदोलन करताना त्यावेळी पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. त्याचसोबत त्यांना तडीपारची नोटीस सुद्धा बजावण्यात आली.(ठाणे: बिल्डिंग बांधकाम करणाऱ्या 86 कामगारांना एकाच वेळी कोरोनाची लागण)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलने पार पडली आहेत. मनसेने नवी मुंबईत ‘थायरोकेयर लॅब’विरोधात आंदोलन होते. या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ही लॅब बंद पाडली. हे सुद्धा आंदोलन  अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले होते.