Maharashtra Shocker: नागपूर मध्ये टीव्ही पाहण्यावरुन आईचा चढला पारा, 15 वर्षीय मुलीने गळफास लावून संपवले आयुष्य

तर टीव्ही पाहत असल्याच्या कारणावरुन आई मुलीला ओरडली असता तिने गळफास लावून आपले आयुष्य संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Shocker:  महाराष्ट्रातील नागपूर मध्ये एक 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. तर टीव्ही पाहत असल्याच्या कारणावरुन आई मुलीला ओरडली असता तिने गळफास लावून आपले आयुष्य संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना जिल्ह्यातील न्यू टोटलाहोड येथे घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(महाराष्ट्र: जळगाव जिल्ह्यातील किनगावाजवळ भीषण अपघात, ट्रक पलटी होऊन 15 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी)

शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान महिलेने मुलीला खुप टीव्ही पाहत असून अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याने ओरडली. त्यानंतर मुलगी नाराज होत आपल्या खोलीत जात त्याचे दार बंद करुन बसली. त्याचवेळी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.मुलीने आत्महत्या केल्यानंतर ही घटना रात्री 8.30 वाजतााच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृ्त्यू म्हणून नोंद केली आहे.(Pune: संतापजनक! शिक्षकांकडून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)

दरम्यान, सध्या पुण्यातील वानवडी भागात सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिने 7 फेब्रुवारीली  आमहत्या करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी  अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, या आत्महत्याशी संबंधित दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने पेट घेतला आहे. दरम्यान, याप्रकरणात विदर्भातील मंत्र्याचा संबंध असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्यासह भाजपचे अनेक नेते करत आहेत.