Maharashtra: शिर्डीत नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा, 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra: शिर्डीत (Shirdi) नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रयत मध्ये शिक्षकाच्या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून 20 लाख आणि अन्य ठिकाणच्या नोकरीचे आमिष दाखवून 58 लखांचा सहा जणांना चुना लावण्यात आला आहे.(General Motors Plant: पुणे येथील जनरल मोटर्स प्लांट होणार बंद, सुमारे 1800 कर्मचाऱ्यांसमोर रोजी-रोटीचा सवाल)

धीरज पाटील आणि विद्या पाटील हे दोघे BA असून त्यांच्याकडे नोकरी नव्हती. परंतु हे दोघे राहत असलेल्या गल्लीत दिनेश आणि वीणा सोनावणे राहण्यासाठी आले. सोनावणे या जोडप्याने पाटील यांना रयत या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले. या दोघांनी मोठ्या विश्वासाने सोनावणे यांना 20 लाख रुपये दिले. पण आठ वर्ष उलटून गेले तरीही नोकरी पण नाही पैसे सुद्धा परत मिळालेले नाहीत. सोनावणे यांनी पाटील दांपत्यांना तुमचे काम नक्की होईल असे ही म्हटले होते. परंतु पाटील यांना असलेल्या नोकरीच्या अपेक्षेवर मात्र पाणी फिरले आहे.(मुंबई: गोवंडीतील शिवाजी नगर भागातून ANC ने जप्त केले 33 लाख किंमतीचे ड्रग्स पिल्स, दोघांना केली अटक)

या प्रकरणात सोनावणे दांपत्यांसह रयत संस्थेचे लेखनिक भाऊ साहेब पेटकर यांच्यावर ही पाटील यांनी आरोप केले आहेत. पेटकर यांनी पाटील यांना एका व्यक्तीला भेटवले. त्यावेळी ही पाटील यांना तुमचे काम होईल असे सांगण्यात आले. परंतु काही झालेच नाही. ऐवढेच नव्हे तर सोनावणे यांनी त्यांच्या मोलकरणीला सुद्धा फसवल्याचे समोर आले आहे.