Maharashtra: राज्यातील वीज ग्राहकांना झटका! वाढीव बिलातून दिलासा मिळणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण
Maharashtra: राज्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व कामकाज बंद पडले होते. याच दरम्यान नागरिकांना वीजेची बिल दुप्पट तिप्पट पटीने आल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच नागरिकांनी वीज कंपन्यांच्या विरोधात ही आंदोलन केल्याचे दिसून आले होते. तर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले होते. परंतु आता त्यांनी यु-टर्न घेतला असून वाढीव वीज बिलांबद्दल नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.(Mumbai Water Drains: आता मुंबईतील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी BMC खर्च करणार तब्बल 160 कोटी रुपये)
नितीन राऊत यांनी या प्रकरणी अधिक स्पष्टीकरत देत असे म्हटले आहे की, वीज वापरणारे जशी ग्राहकांची संख्या आहे. त्याचपद्धतीने महावितरण सुद्धा एक ग्राहक आहे. कारण त्यांना सुद्धा वीज घ्यावी लागत असून त्यासाठी निरनिराळे शुल्क भरावे लागतात. त्याचसोबत संपूर्ण बिल भरणाऱ्यांना वीज बिलांवर दोन टक्के सूट सुद्धा दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी वाढीव वीज बिलांबद्दल तक्रारी केल्या. त्याचे निवारण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. मात्र आता सवलत देण्याची बाब बंद झाली असून महावितरणाला 69 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे आता अधिक कर्ज काढणे शक्य नसल्याचे ही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.(वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभुमीवर दिलासा! बोनस दिला जाणार असल्याची नितीन राऊत यांची घोषणा)
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वाढीव वीज बिल पाठवल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये नागरिकांना वीज बिलांमध्ये सवलत देता येईल का याचा सुद्धा विचार केला गेला. मात्र त्यावर अद्याप तोडगा काढण्यात यश आले नाही. पण आता नागरिकांना वाढीव वीज बिलापासून दिलासा मिळणार नसल्याचे नितीन राऊत यांनी म्हटल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येणार हे नक्कीच.