Maharashtra: नांदेड मधील गुरुद्वारा तर्फे दसऱ्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीबद्दल राज्य सरकारने निर्णय घ्यावा- सुप्रीम कोर्ट

File image of Supreme Court | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील नांदेड  (Nanded) जिल्ह्यातील गुरुद्वारा तर्फे दसऱ्याच्या (Dussehra)  दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने सोमवारी सुनावणी केली. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका किंवा उत्सव साजरा कोणत्या स्तरावर साजरा करण्यास परवानगी द्यावी हे राज्य सरकारने ठरवावे. तसेच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय गुरुद्वाराला मान्य नसल्यास ते हायकोर्टात जाऊ शकतात.

राज्य सरकारकडून कोर्टात असे म्हणण्यात आले की, कोरोनाच्या काळात कोणत्याही पद्धतीच्या मिरवणूका काढण्यास परवानगी दिलेली नाही. सुप्रीम कोर्टाने असे ही म्हटले की, नांदेड मधील गुरुद्वारा तर्फे काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीसंदर्भात एसडीएमएम यांना सद्यच्या स्थितीच्या आधारावर निर्णय घ्यावा लागणार आहे. या व्यतिरिक्त नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापनाला उद्या पर्यंत एसडीएमएसमोर अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.(Gyms And Fitness Centres: महाराष्ट्रात येत्या 25 ऑक्टोबरपासून व्यायामशाळा, फिटनेस सेंटर उघडणार; मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती)

कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना गुरुद्वाराच्या समितीची याचिका सुद्धा ऐकून घ्यावी असे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती एल नागेश्वर आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठा समोर सुनावणी पार पडली. दरम्यान, नांदेड मधील सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब बोर्डाकडून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत बोर्डाने तीन पिढ्यांपासून चालत अलेली ही परंपरा 'दसरा, दीपमाला आणि गुरता गद्दी' चे आयोजन काही नियमांनुसार करण्याची मागणी केली होती.

याचिकेत असे म्हटले होते की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत शोभा यात्रा काढण्याची परवानगी दिली होती. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, या कार्यक्रमात कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. यावर गुरुवद्वाराकडून असे सांगण्यात आले की, आम्ही समुदायाने एकत्रित येण्याचे बोलतच नाही आहे. फक्त एका ट्रकमध्ये ग्रंथ साहिब ठेवले जाणार आहेत. याचे लाइव्ह सुद्धा दाखवले जाईल.(Navratri 2020: नवारात्रौत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर प्रशासनासह पोलिसांकडून संपूर्ण तयारीनिशी सज्ज, भाविकांना ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेता येणार)

महाराष्ट्र सरकारने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले की, लोकांचे आरोग्य पाहता कोणत्याही प्रकराच्या गर्दीसाठी परवानगी दिलेल नाही. सरकारने असे ही म्हटले की, राज्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी आहे. ऐवढेच नाही तर गणेशोत्सवावेळी सुद्धा अशा मोठ्या उत्सवाला परवानगी दिली गेली नव्हती.