लालपरी ची मालवाहतूक क्षेत्रात नवी भरारी; 21 मे पासून आजपर्यंत मालवाहतूकीच्या 543 फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला मिळवून दिले 21 लाख रुपये
21 मे पासून आजपर्यंत मालवाहतूकीच्या 543 फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला 21 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. एस. टी. ने या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात 3 हजार टन मालाची वाहतूक केली असून 90 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.
महाराष्ट्राची (Maharashtra) जीवनवाहिनी लालपरीने (Lalpari) मालवाहतूक (Freight) क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे. 21 मे पासून आजपर्यंत मालवाहतूकीच्या 543 फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला 21 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. एस. टी. ने या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात 3 हजार टन मालाची वाहतूक केली असून 90 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.
दरम्यान, राज्यात प्रत्येक विभागात 10 प्रमाणे 330 बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत 72 बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 372 बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - COVID-19 प्रार्दुभाव रोखण्यासाठी ऑफिसला जाणा-या कर्मचा-यांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वे)
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी लालपरी नेहमी तत्पर असते. लॉकडाऊन काळात एस टीने आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले आहे. आतापर्यंत लालपरीने तब्बल 152 लाख कि. मी चा प्रवास केला आहे. (हेही वाचा - लॉकडाऊनबद्दल अफवा पसरवू नका; आदित्य ठाकरे यांचे जनतेला आवाहन)
महामंडळाच्या वतीने जुन्या एसटी बसमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करण्यात येत आहे. ज्या प्रवासी वाहनांचे आयुर्मान दहा वर्षे पूर्ण झाले आहे, अशा प्रवासी वाहनांच्या अंतर्गत रचनेत बदल करून ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्याच्या विविध भागातून अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, कृषी उत्पादने आदींची मालवाहतूक एस.टी मधून केली जात आहे.