Lifeline Express: भारताने बनवली जगातली पहिली ‘हॉस्पिटल रेल्वे’ जेथे मिळणार मोफत उपचार

या रेल्वेमध्ये हॉस्पिटलच्या सुविधा मिळणार आहेत. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर पेजवर या एक्सप्रेसचे फोटोज शेअर करुन याबाबत रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली आहे.

Lifeline Express: भारताने बनवली जगातली पहिली ‘हॉस्पिटल रेल्वे’ जेथे मिळणार मोफत उपचार
Lifeline Express (Photo Credits: Twitter)

भारतीयांना रेल्वे प्रवास अधिकाधिक सुखकर बनण्यासाठी आणि रुग्णांना देखील आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचता यावे यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी आली आहे. भारतीय रेल्वेने जगातील पहिली 'हॉस्पिटल ट्रेन' (Hospital Train) बनवली आहे. या रेल्वेचे नाव 'लाईफलाईन एक्सप्रेस' (Lifeline Express) असे आहे. आतापर्यंत जगातील कुठल्याही देशात अशी रेल्वे आलेली नाही आहे. या रेल्वेमध्ये हॉस्पिटलच्या सुविधा मिळणार आहेत. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर पेजवर या एक्सप्रेसचे फोटोज शेअर करुन याबाबत रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway) माहिती दिली आहे.

ही लाईफलाईन एक्सप्रेस 7 डब्ब्यांची असून या ट्रेनमध्ये 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, 5 ऑपरेटिंग टेबल आहेत. यासह ट्रेनमध्ये मेडिकल स्टाफ रुमही आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccination in India: केवळ आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांनाच मिळणार मोफत लस; डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण

भारतीय रेल्वेने ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध आहेत. शिवाय अत्याधुनिक उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम यात तैनात आहे. सध्या ही ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर उभी असून विशेष म्हणजे सर्व रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. सर्वात आधी भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची सुरूवात केलीये, त्यानंतर आता इतर देशही अशी ट्रेन सुरू करण्याचा विचारात आहेत.

ही रेल्वे म्हणजे एक चालते-फिरते रुग्णालय असणार आहे. यात हॉस्पिटलप्रमाणे सर्व सुविधा, कर्मचारी आणि डॉक्टर्स असणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत देखील याचा रेल्वेचा खूप फायदा होईल असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2021 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).