Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष निमित्त विशेष टपाल तिकीटाचे अनावरण
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
Annabhau Sathe Postage Stamps: साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून यंदा महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये यंदा अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाचं बोधचिन्ह आणि खास टपाल तिकीट यांचे प्रकाशन करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तिकीटाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री अविनाश महातेकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित होते.
बोधचिन्ह आणि टपाल तिकीट अनावरणासोबतच शासकीय कार्यक्रमामध्ये आज गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश देऊन गौरवण्यात आलं. Annabhau Sathe Jayanti 2019: अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात; जाणून या लोकशाहीराबद्दल 6 खास गोष्टी!
अण्णाभाऊ साठे टपाल तिकीट
अण्णा भाऊ साठे हे पोवाडा आणि लावणी यासारख्या लोकसंगीत शैलीच्या वापराने लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या विशेष लेखनापैकी ‘फकिरा’ या कांदबरीस 1959 साली ‘राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता.