Maharashtra: दिशावरुन केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सलीयन परिवाराची पोलिसात तक्रार, राणे पिता-पुत्र अटकपूर्व जामिनासाठी करणार अर्ज

कारण राणे यांच्याकडून दिशा सलीयन हिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आणि वादग्रस्त विधान केल्याने प्रकरण अधिकच चिघळले गेले आहे.

नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Maharashtra:  गेल्या काही दिवसांपासून दिशा सलीयन हिचे प्रकरण पुन्हा जोर धरु लागले आहे. कारण राणे यांच्याकडून दिशा सलीयन हिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आणि वादग्रस्त विधान केल्याने प्रकरण अधिकच चिघळले गेले आहे. अशातच दिशा सलीयन हिच्या पालकांनी राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरुन आता नारायण राणे आणि पुत्र नितेश राणे हे अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज करणार असल्याची बातमी समोर आली आहे.(Actor Kiran Mane: अभिनेता किरण माने पुन्हा चर्चेत, सोनाली कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट आणि आर्यन खान प्रकरणावर रोखठोक प्रतिक्रिया) 

राणे पिता-पुत्रांनी दिशा सलीयन संदर्भात केलेल्या विधानांवरुन शिवसेना सुद्धा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तर काही दिवसांपूर्वीच महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा दिशाच्या पालकांची भेट घेतली होती. तसेच महिला आयोगाकडे सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी तक्रार केली होती. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहेच. पण महिला आयोगाने याबद्दल तातडीने पाउले उचलत पोलिसांनी यासंदर्भातील रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. याआधी सुशांत सिंह राजपूत वरुन ही वाद निर्माण झाल्याचे दिसून आले होते.(Maharashtra Budget Session 2022: राज्यपाल BS Koshyari यांच्या अभिभाषणाच्या वेळेस सत्ताधारकांचा गदारोळ; भाषण थांबवत कोश्यारी पडले सभागृहाबाहेर)

दरम्यान, राणे यांनी दिशा सलीयनच्या मृत्यूप्रकरणात मोठे दावे केले आहेत. त्यांनी असे म्हटले की, दिशा हिच्यावर बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या केली. त्याचसोबत दिशा ही गरोदर सुद्धा होती. पण राणेंच्या या आरोपांवर दिशा सलीयनच्या कुटुंबियांनी आक्षेप घेत आपल्या मुलीची होणारी बदनामी थांबवा असे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.  या व्यतिरिक्त राणेंनी केलेल्या आरोपावरुन महिला आयोगाकडे सलीयनच्या कुटुंबियांनी दाद मागितली होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्रांना हे प्रकरण कितपत भोवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.