Maharashtra: देशी दारुचा काढा देत 50 रुग्णांची कोरोनावर मात, डॉक्टरचा अजब दावा ऐकून प्रशासनाने धाडली नोटीस
दिवसागणिक 3 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. तर एका दिवसात 3 हजार जणांना मृत्यू होत आहे.
Maharashtra: देशभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसागणिक 3 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. तर एका दिवसात 3 हजार जणांना मृत्यू होत आहे. कोरोनावर मात देण्यासाठी ठोस असे कोणतेच औषधोपचार नाही आहेत. अशातच काही बनावट डॉक्टर कोरोनाला नष्ट करण्याचा दावा करत आहेत. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रातील अहमदनर येथील समोर आली आहे. येथे एका डॉक्टरने देशी दारुच्या काढ्याने कोरोनाच्या 50 रुग्णांना बरं केल्याचा दावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला नोटीस धाडण्यात आल्यानंतर त्याने तो व्हिडिओ हटवला आहे.
देशी दारुचा काढा पिऊन रुग्ण ठिक होत असल्याचा अजब दावा महाराष्ट्रातील डॉक्टर अरुण भिसे यांने केला होता. हा व्हिडिओ तुफान व्हायरल सुद्धा झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की, ज्या दिवशी तुमच्या तोंडाची चव जाईल, भुक कमी होईल त्याच दिवसापासून ज्या गोष्टींमध्ये 40 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असेल अशा वस्तू घ्या. एकूणच त्याचा म्हणण्याचा उद्देश होता की, दारु प्या. या व्हिडिओत त्याने पुढे म्हटले की,30 मिलीलीटर दारु आणि 30 मिलीलीटर पाणी मिळून रुग्णांना द्यावे.(Jalna: एका वृद्ध व्यक्तिला दिल्या कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या डोस; प्रथम Covaxin त्यानंतर Covishield, जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार)
तर आतापर्यंत त्याने 40-50 रुग्णांना दारु पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यात 10 रुग्ण गंभीर आजारी होते. डॉक्टरच्या मते, आता पर्यंत एका सुद्धा रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या रुग्णांना दारु देण्यामागे डॉक्टरने काही कारणे सुद्धा सांगितली आहेत. त्याने असे म्हटले की, कोरोना व्हायरसवरील वरचा स्तर हा लिपिडचा असतो तो अल्कोहोलच्या संपर्कात आल्यानंतर नष्ट होतो.(COVID-19: आपले आयुष्य केवळ ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, इंजेक्शनच्याच कक्षेत राहात आहे तुकाराम मुंडे)
डॉक्टरचा हा अजब दावा करण्यात आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर अहमदनगर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. डॉक्टरांचा तातडीने शोध घेत त्याला नोटीस धाडण्यात आली. खास गोष्ट अशी की, नोटीस मिळाल्यानतर डॉक्टरने आपला दावा फेटाळून लावला. नंतर नवी पोस्ट केली ती व्हायरल झाली आहे. हा डॉक्टर गावातील एका शासकीय रुग्णालयात काम करतो.